Saturday, 28 May 2011

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला



सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !

रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?



गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी

अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला ?




निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती

छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला



जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली

खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

Subscribe to get more videos :