Thursday, 19 May 2011

Lav lav Kari paat



लवलव करी पात, डोळं नाही थाऱ्याला

एकटक पाहु कसं, लुक-लूक ताऱ्याला



चवचव गेली सारी, जोर नाही वाऱ्याला

सुटं-सूटं झालं मन, धरू कसं पाऱ्याला



कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची

रूणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची



तटतट करी चोळी, तुटतुट गाठीची

उंबऱ्याशी जागी आहे, पारूबाई साठीची

Subscribe to get more videos :