गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं
सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासराला
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
1 comments:
Write commentsThnx for uploading this one of the wonderful gem in marathi song
Reply