Saturday, 28 May 2011

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरा



मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे !



लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की

राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे !




गर्द राईतून यावा भारलेला गार वारा

तू मुक्या ओठात माझ्या दंशताजे ऊन्ह प्यावे !



चांदण्याचा श्वास जाईच्या फुलांमाजी विरावा ...

आपुल्या डोळ्यात साऱ्या तारकांनी विर्घळावे !



तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी

रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे !



रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी ...


मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !

Subscribe to get more videos :