या रावजी, बसा भावजी
कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी
वळक तुमची धरून मनी
काय करू सांगा तुमची अहरजी
तुम्हा बघुन डावा डोळा झाकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी
तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी
अशी रोखा नजर त्यात भरलं जहर
घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
रूप रंगाच्या महाली सुख माजं रंगलं
काळजाच्या झुंबराला दु:ख माजं टांगलं
नको पर्वा आता माजं जीणं लुटा
असा जुगार उलटा मी हो मांडला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
रोज बुरखा नवा रोज नवी मजा
तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा
तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन
ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला